अमळनेर | खान्देश 24 न्यूज

अमळनेर,न्यूज,/अंबरीश टेकडीच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कथित खडी-मुरूम उत्खननाचे आणखी धक्कादायक दृश्य समोर आले आहे. परिसरातील छायाचित्रे पाहता मोठ्या प्रमाणात जमिनीची खोदाई झाल्याचे आणि नैसर्गिक भूभागाची अवस्था बदलल्याचे दिसून येत आहे.

प्रश्न केवळ मुरूम किंवा खडी काढण्याचा नाही, तर या उत्खननासाठी शासनाची अधिकृत परवानगी आहे का, हा आहे!

स्थानिकांकडून रात्रीच्या अंधारात उत्खनन आणि डंपरच्या माध्यमातून वाहतूक होत असल्याचे आरोप केले जात आहेत. मग या संपूर्ण व्यवहारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाने आतापर्यंत काय केले?

प्रशासनाला थेट सवाल

अंबरीश टेकडी परिसरात उत्खननासाठी कोणाला परवानगी दिली?
उत्खननाचे प्रमाण किती आहे?
किती ब्रास मुरूम आणि खडी बाहेर नेण्यात आली?
शासनाच्या तिजोरीत किती रॉयल्टी जमा झाली?
रात्रीच्या उत्खननावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नेमकी कुठे आहे?
तहसीलदार आणि खनिकर्म विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे का?

पडद्यामागे नेमके कोण?

या उत्खननामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा आणि संशय व्यक्त होत आहे. मात्र या आरोपांची अधिकृत चौकशी होणे गरजेचे आहे.
जर उत्खनन बेकायदेशीर असेल, तर संबंधितांवर कारवाई का होत नाही? आणि उत्खनन अधिकृत असेल, तर परवानगी व रॉयल्टीची माहिती जनतेसमोर का आणली जात नाही?

अंबरीश टेकडीचा नैसर्गिक परिसर वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार अमळनेर यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

🔥 पुढील भाग ३ मध्ये : खडी-मुरूम उत्खननाचे परवाने नेमके कोणाकडे? शासनाची रॉयल्टी भरली जाते की शासनाच्या महसुलावरच डल्ला?
खान्देश 24 न्यूज, अमळनेर जनतेचा आवाज… प्रशासनाला जाब विचारणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?