खानदेश 24 न्यूज | अमळनेर
खानदेश 24 न्यूज | अमळनेर
अमळनेर नगरपरिषदेच्या पै.शेठ एम. एच. हाशिम प्रेमजी व्यापारी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर! सुप्रसिद्ध भद्रा मॉलचा संचालका ने अतिक्रमण करून घेतल्याचा आरोप; नगरपरिषद प्रशासन कारवाई करणार का?
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या पै. शेठ एम.एच. हशमजी प्रेमजी व्यापारी संकुलातील सुप्रसिद्ध भद्रा प्रतीक कुशन आणि फर्निचर मॉलचा कथित अतिक्रमणाचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. या व्यापारी संकुलाच्या बाह्य भागाची छायाचित्रे समोर आली असून, संकुलातील दुकानांसमोरील जागा आणि सार्वजनिक वापराच्या जागेच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
नगरपरिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात दुकानदारांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले असताना, संबंधित भद्रा प्रतीक मॉलचे हद्दीबाहेर अतिरिक्त जागेचा वापर केला आहे का ? सार्वजनिक रस्ता किंवा पादचारी मार्गावर अतिक्रमण झाले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष की नियमांना बगल?
नगरपरिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात अतिक्रमण होत असल्याची शंका व्यक्त होत असताना संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी आणि मोजणी करण्यात आली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यापारी संकुलातील दुकानांच्या मंजूर नकाशानुसार प्रत्यक्ष बांधकाम झाले आहे का, तसेच सार्वजनिक जागा कोणाच्या ताब्यात आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे!
अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करावी. व्यापारी संकुलाचा मंजूर नकाशा, बांधकाम परवानगी आणि प्रत्यक्ष जागेची मोजणी करून नियमबाह्य बांधकाम किंवा अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेली सार्वजनिक जागा नेमकी कोणाच्या वापरासाठी? नगरपरिषदेच्या मालमत्तेवर नियमांचे पालन होते आहे का?
या प्रश्नांची उत्तरे आता अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खानदेश 24 न्यूज अमळनेर

