जळगावच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू; मागणी नसताना खर्च कशासाठी?

जळगावच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू; मागणी नसताना खर्च कशासाठी?

कोणताही प्रस्ताव, मागणी किंवा गरज नसताना सुरू असलेल्या कामाबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

जळगाव | खान्देश 24 न्यूज

जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सध्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या कामासाठी कोणाचीही मागणी नसताना, कोणतीही ठोस गरज नसताना तसेच कोणताही प्रस्ताव नसताना हे काम हाती घेण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे.

शासकीय संस्थांमध्ये सार्वजनिक निधीचा वापर करताना कामाची आवश्यकता, विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा आणि संस्थेच्या विकासाला प्राधान्य देणे अपेक्षित असते. मात्र, संबंधित कामाची प्रत्यक्ष गरज काय आहे? भिंतीची उंची वाढविण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुविधांपेक्षा भिंतीच्या कामाला प्राधान्य?

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण सुविधा, आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री आणि मूलभूत सोयी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत भिंतीची उंची वाढविण्याचे काम प्राधान्याने का हाती घेण्यात आले, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

प्रशासनाने स्पष्टता द्यावी

या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे? कामाचा प्रस्ताव कोणी सादर केला? प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरी घेण्यात आली आहे का? तसेच कामाची प्रत्यक्ष आवश्यकता काय आहे? याबाबत संबंधित विभागाने खुलासा करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक निधीचा विनाकारण खर्च होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करावी आणि कामाच्या आवश्यकतेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आता या प्रकरणात संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खान्देश 24 न्यूज | जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?