दहिवद येथे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

खान्देश 24 न्यूज, अमळनेर

प्रतिनिधी 

धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा निमित्त लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आदिवासी विकास विभागातर्फे, दहिवद (ता. अमळनेर) येथे मोफत आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिक व आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला,
शासनाच्या आदिवासी विकास विभाग व स्थानिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल तसेच माता-बाल आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्थानिक पौष्टिक आहार, परसबाग आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत मोफत औषधोपचार केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक आदिवासी नेते व पदाधिकारी आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे व आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,

दरम्यान आज दिनांक 18 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह व इतर तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये एकूण 52 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सदर शिबिरात लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे नेते श्री. पन्नालाल मावळे मा. उपसरपंच श्री. प्रवीण आंबा माळी, सामाजिक कार्यकर्ते गणेश माळी (बाळाभाऊ) यावल प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी श्री खंबायत साहेब,शासकीय आश्रम शाळा दहिवद मुख्याध्यापक श्री शिरसाठ सर व अधीक्षक चव्हाण सर, वैद्यकीय अधिकारी कदम मॅडम, दहीवद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री घनश्याम पाटील सर, दहिवद आश्रमशाळा येथील ANM पवार मॅडम, दहिवद ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. सुरेश कठाळे, ग्रामसेवक श्री शेखर धनगर, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा ताडेपुरा अमळनेर येथील प्राथमिक मुख्याध्यापक श्री रजनीकांत भामरे सर, कनिष्ठ लिपिक जाकीर शेख, आरोग्य केंद्रातील सर्व नर्स व आशा सेविका व गावातील आदिवासी कार्यकर्ते समाधान पारधी, मुकेश पारधी, तेजस पारधी, फोटोग्राफर भागवत पारधी, अजय पारधी, सुनिल चव्हाण, नरेश पारधी, दिनेश साळुंके, अनिल चव्हाण, मिथुन चव्हाण, मनोज पारधी, सागर पारधी, प्रमोद पारधी, सहकारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?