अमळनेर शहरात नवीन सुरु झालेल्या उगले इराणी कॅफेमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर!

खान्देश 24 न्यूज, अमळनेर 

अमळनेर : मोठया थाटात अमळनेर शहरात सुरु करण्यात आलेल्या उगले इराणी कॅफेमध्ये स्वच्छ ते चा प्रश्न ऐरणीवर ग्राहकांना चहा आणि कॉफी देण्यासाठी फुटलेले कप आणि फुटलेले प्लेट्स वापरण्यात येत आहे.

तसेच कॅफेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ व योग्य सुविधा उपलब्ध आहेत का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेसोबतच भांडी, कप यांची व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे का? अन्नपदार्थ कायद्यानुसार परिसराची स्वच्छता राखणे ही व्यावसायिकांची जबाबदारी आहे.
कॅफे मध्ये काम करणाऱ्या स्टाफ च्या हातात संरक्षक हात मोजे व डोक्यावरची टोपी (हेअर कॅप) नाही.
हॉटेल व कॅफेमध्ये नागरिक मोठ्या विश्वासाने चहा-कॉफी आणि खाद्यपदार्थांचे सेवन करण्यासाठी येतात. मात्र, वापरण्यात येणाऱ्या कपांची स्वच्छता योग्य प्रकारे राखली जात नसेल, तर ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर संबंधित अन्न सुरक्षा विभागाने उगले इराणी कॅफेची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये हलगर्जीपणा नको. अशी अपेक्षा उगले कॅफे बद्दल नागरिकां कडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?