महात्मा फुले स्मारकाजवळ प्रतिमापूजन व माल्यार्पण; मान्यवरांनी व्यक्त केल्या बाळासाहेबांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या भावना

खान्देश 24 न्यूज धरणगाव 

धरणगावात सहारा बहुउद्देशीय संस्थेतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन!

महात्मा फुले स्मारकाजवळ प्रतिमापूजन व माल्यार्पण; मान्यवरांनी व्यक्त केल्या बाळासाहेबांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या भावना

धरणगाव | प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त धरणगाव येथील सहारा बहुउद्देशीय संस्थेतर्फे धरणी चौकातील महात्मा फुले स्मारकाजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकास सर्वप्रथम माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात माळी समाजाचे माजी अध्यक्ष विठोबा माळी, माळी समाजाचे अध्यक्ष व्ही. टी. माळी सर, भोई समाजाचे अध्यक्ष सुनील जावरे, माळी समाजाचे ज्येष्ठ पंच रावा धनालाल माळी, माजी सचिव दशरथ महाजन आणि सहारा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक लक्ष्मण महाजन यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा रोखठोक स्वभाव, निर्भीड नेतृत्व, स्पष्टवक्तेपणा आणि सामान्य माणसांबद्दल असलेली तळमळ आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या विचारांतून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे, समाजातील एकोपा टिकवणे आणि समाजसेवेचा वसा पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत सहारा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

या अभिवादन कार्यक्रमाला सहारा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक लक्ष्मण महाजन, उपाध्यक्ष विनोद रोकडे, सचिव रमेश चव्हाण, संचालक रणजित सिकरवार, पवन माळी, निखिल साळुंखे, डॉ. गणेश महाजन, दीपक बाविस्कर, आबा महाजन, बाळू महाजन, आयुष जैन, राजू महाजन, भोला महाजन, बापू महाजन, प्रवीण निकम, राजमल संचेती, किशोर जैन, हरिनाथ महाजन, मागलेशसिंह राजपूत, कैलास महाजन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत सामाजिक एकोपा आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

खान्देश 24 न्यूज धरणगाव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?