खान्देश 24 न्यूज,अमळने
“माझ्या मुलाला न्याय मिळेल का?“ वृद्ध आईच्या डोळ्यांत अश्रू; नागावच्या आंदोलनातून प्रशासनासमोर न्यायाचा टाहो!
अमळनेर | खान्देश 24 न्यूज
एका आईने आपल्या मुलाला जन्म दिला, त्याला लहानाचे मोठे केले, आयुष्यभर त्याच्या सुखाची स्वप्ने पाहिली… मात्र काळाने तिच्या आयुष्यात असा घाला घातला की, आज वयाच्या ७५व्या वर्षी तिला आपल्या मुलाच्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून प्रशासनाचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत.
नगाव बुद्रुक येथील शेतकरी कै. शरद रतन पाटील यांच्या डंपरखाली नियोजनपूर्वक चिरडून मारले आणि संपूर्ण गाव हादरले आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या ७५ वर्षीय आईची न्यायासाठी सुरू असलेली धडपड मन हेलावून टाकणारी आहे.
वृद्ध आईच्या डोळ्यांत अश्रू, मनात एकच प्रश्न – माझ्या मुलाला न्याय कधी मिळणार?
अवैध वाळू वाहतुकीविरोधात आवाज उठविणाऱ्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी अवैध वाळू वाहतुकीविरोधात तक्रार दाखल झाली आणि ३१ ऑक्टोबर रोजी शरद पाटील यांचा डंपरखाली चिरडून खून करण्यात आला . या घटनांमधील मास्टरमाईंड आणि फरार आरोपी यांना अटक व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
न्यायासाठी नगावच्या महिला आणि नागरिक रस्त्यावर!उतरले

शरद पाटील यांच्या मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई व्हावी, अवैध वाळू वाहतुकीला कायमचा आळा बसावा, तसेच तक्रारदार व साक्षीदारांना संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी नागावच्या महिला आणि नागरिकांनी अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयात मोठे ठिय्या आंदोलन केले.
खान्देश 24 न्यूज, अमळनेर

