वाळू माफिया आणि निष्पाप शेतकरीचा खुनातील फरार आरोपी असलेल्या गुन्हेगारा विरोधात प्रांत कार्यालयात नगावकरांचा एल्गार

खान्देश 24 न्यूज | अमळनेर

नगाव बुद्रुक येथील शेतकरी कै. शरद रतन पाटील यांच्या डंपरखाली झालेल्या मृत्यूनंतर आता ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न आणि मृत्यू प्रकरणातील तपास व कारवाईबाबत असमाधान व्यक्त करत नगाव येथील महिला आणि नागरिकांनी अमळनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत मोठे ठिय्या आंदोलन केले.
केवळ निवेदन देऊन प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेत महिला आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला.
तक्रारीनंतर तीन दिवसांत शेतकऱ्याचा मृत्यू; तेरा दिवस होऊन ही मुख्य आरोपी अजून अटक झाली नाही
निवेदनानुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्ञानेश्वर काळूगीर गोसावी यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी रात्री नागाव बुद्रुक येथील शरद रतन पाटील यांचा HR 37 D 8957 क्रमांकाच्या डंपरखाली चिरडून मृत्यू झाला.
मृत शरद पाटील हे संबंधित प्रकरणातील साक्षीदार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा प्रश्न!
निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मा. प्रांत अधिकारी यांनी संबंधित डंपर व दोन ट्रॅक्टर जप्त करण्याच्या कारवाईबाबत दिरंगाई केल्यामुळे शरद पाटील यांच्या खून करण्यात आला. असा आरोप प्रांत अधिकारींवर ग्रामस्थांनी केला तसेच अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ठोस आणि प्रभावी पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फरार आरोपी व मुख्य मास्टर माईंड असलेला आरोपीला अटक करावी अशी मागणी मृत शरद पाटील यांच्या परिवारा सोबत संपूर्ण गावकरीनी केली 
निवेदनात ज्ञानेश्वर गोसावी, अनिल उर्फ अमृत पाटील व इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार, संभाव्य हितसंबंध आणि या प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीची भूमिका निष्पक्षपणे तपासावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महिला रस्त्यावर उतरल्या; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
या आंदोलनातून महिलांनी आणि नागरिकांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. गावात अवैध वाळू वाहतुकीविरोधात आवाज उठवणाऱ्या तक्रारदार आणि साक्षीदारांना सुरक्षितता मिळावी ?
नगावच्या महिला आणि नागरिकांचे हे आंदोलन केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचा प्रश्न नसून गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचा प्रश्न बनले आहे.

खान्देश 24 न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?