​कळवण तालुक्यात जलसंधारणाचा आदर्श; अभोणा राऊंडमध्ये श्रमदानातून ‘वनराई बंधारा’ पूर्ण

खान्देश 24 न्यूज 

​अभोणा / कळवण:
कळवण तालुक्यातील एफडीसीएम (FDCM) अभोणा राऊंडअंतर्गत देसगाव बीटमधील कक्ष क्रमांक २७९ मध्ये जलसंधारण आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वनराई बंधाऱ्याचे’ बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
​परिसरात पाण्याची उपलब्धता वाढावी आणि जलसंधारण व्हावे, यासाठी वनविभागाच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमात वन परिमंडळ अधिकारी श्री. निलेश वाल्मीक कापडणे, वनरक्षक श्री. संदीप पाटील, जि.प. प्राथमिक शाळा मोहपाडाचे मुख्याध्यापक श्री. विलासराव काशिनाथ भोये, पदवीधर शिक्षण सेवक श्री. भरत चंदर चव्हाण, तसेच शाळेचे उत्साही विद्यार्थी आणि मोहपाडा ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग घेऊन बहुमूल्य श्रमदान केले.

​सामूहिक प्रयत्नांतून उभा राहिलेला हा वनराई बंधारा या भागातील भूजल पातळी वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, वनविभाग व ग्रामस्थांच्या या लोकसहभागाबद्दल कळवण तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?