खान्देश 24 न्युज
जातीवादाचा आणि महापुरुषांच्या विटंबना करणारी विषारी विकृतीचा साप अजून ही का?मरत नाही….
सविस्तर वृत्त असे की हेडावे गावातील काही काम धंदा नसलेला बेरोजगार तरुण वाल्मिक भालेराव पाटील याने त्याचा विकृत जातीवादी मानसिकतेतुन त्याचा इन्स्टाग्राम अकाउंट वर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विखारी अशी पोस्ट वायरल केली. ती पोस्ट समाज माध्यमातून व्हायरल झाल्यावर काही स्थानिक आंबेडकरी तरुणांना ती पोस्ट समजली त्यांनी एकाच गावात राहणारा तरुण म्हणून त्याला समजवण्याचा सुरात विचारपूस केल्यावर त्याने आंबेडकरी तरुणांना मुजोरीपणात उद्धट उत्तर दिले. तोवर ही पोस्ट अमळनेरचे सामाजिक कार्यकर्ते विजय संदानशिव( ex army ) यांना समजली त्यांनी तात्काळ पंचशील युवक मित्र मंडळ भीम नगर ताडेपुरातील समस्त आंबेडकरी युवकांना घेऊन आणि हेडावे चा तरुणांशी संपर्क साधून घटने बद्दल माहिती घेऊन त्या विकृत तरुणाचा विरोधात कायदेशीर
कारवाई करण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनला बोलावले सोबत सामाजिक कार्यकर्ते सोमचंद संदानशिव,विजय संदानशिव (ex Army )यशवंत बैसाणे अँड.अमोल ब्रम्हे,अँड प्रशांत संदानशिव किरण बहारे,अर्जुन संदानशिव आणि पंचशील युवक मित्र मंडळ भीम नगर (ताडेपुरा) आणि AB ग्रुप चे असंख्य युवक त्या विकृत तरुणावर कायदेशीर कारवाई साठी मागणी करू लागले सदर घटनेचे गांभीर्य हेडावे चे सरपंच भास्कर रामदास पाटील आणि उप सरपंच कैलास बागुल यांना कळाल्यावर यांनी त्या मुलाचे वडील आणि काका सोबत काही प्रतिष्ठित नागरिक यांच्या मार्फत अँड अमोल ब्रम्हे यांना संपर्क करून त्यांच्या मधस्थी तुन विकृत तरुणाला पोलीस प्रशासना मार्फत समाजाची माफी मागायला भाग पाडले अशा विषारी जातीवादी मानसिकतेमुळे कठोर अशी ॲट्रॉसिटी होऊ शकते असा दम आणि समज पोलीस प्रशासन आणि समस्त अमळनेर शहरातील आंबेडकरी समाजा मार्फत देण्यात आला.
दरम्यान या जातीवादी घटने बद्दल कट्टर आंबेडकरी कार्यकर्ते असलेले रोहित पिंटू अहिरे( पंचशील युवक मित्र मंडळ भीम नगर ताडेपुरा, अंमळनेर )यांना उशिरा कळल्यावर हे स्वतः हेडावे येथे जाऊन स्थानिक आंबेडकरी तरुणांसोबत त्या विकृत जातीवादी तरुणांपैकी एकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर माफी मागायला लावली.
शेवटी मूळ प्रश्न तोच की… जातीवादाचा आणि महापुरुषांच्या विटंबना करणारी विषारी विकृतीचा साप अजून ही का??? मरत नाही….

