*दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री महोदयांना लोकसंघर्ष मोर्चाचे राज्यव्यापी निवेदन

खान्देश 24 न्यूज 

अमळनेर, प्रतिनिधी 

लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आदिवासी, व वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अमळनेर तहसीलदार डॉ. उमा ढेकळे मॅडमांना विविध २२ विषयांचे निवेदन देण्यात आले,

निवेदन देतेवेळी लोक संघर्ष मोर्चा चे पन्नालाल मावळे सह निलाबाई भिल, आनंद पवार, शरद पाटील, शंकर भिल गणेश माळी, राजेंद्र पारधी, मधुकर चव्हाण, गणेश पारधी, संजय बारेला, जयदेव पारधी, शांताराम पारधी, हेमंत दाभाडे, भुरा पारधी, धनराज पारधी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?