खान्देश 24 न्यूज
अमळनेर प्रतिनिधी
जायंटस् ग्रुप ऑफ अमळनेर ही सेवा भावी संघटना नेहमी सामाजिक कार्यात उदत्त आणि प्रामाणिक हेतूने कार्यरत असते.
याच प्रामाणिक हेतूने आज दिनांक 5/10/ 2026 रोजी सकाळी10:30वाजता गरीब,कष्टकरी, असे भिल्ल वस्ती तील कोर्ट पाणी टाकी जवळील रहिवाशी यांना दिवाळी भेटवस्तू हिवाळी ब्लॅंकेट व फरसाण वाटप चा कार्यक्रम ज्येष्ठ मार्गदर्शक
नानासो… श्री. चंदुलाल बडगुजर सर यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जायंटस् ग्रुप ऑफ अमळनेरचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्री सुनील पाटील सर,अध्यक्ष डॉ महेश रमण पाटील सर,श्री पी आर भावसार सर,मुंडके सर,उपाध्यक्ष ऍड.राजेंद्र चौधरी सर,
सचिव श्री संदीप महाजन सर, श्री महेश पाटील व डॉ निलेश शिंगाणे, सचिन ओसवाल हे उपस्थित होते.

