सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 18 रोजी सोमवारी संध्याकाळी बॉलीवूड कलाकार टायगर श्रॉफ यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात टायगर श्रॉफ त्यांच्या ड्राइवर फिरदोस हाताला गोळी लागून गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर तात्काळ स्वतः टायगर श्रॉफ यांनी ड्रायव्हिंग करून स्व सुरक्षेसाठी शांताक्रुज पोलीस स्टेशनला गाडी नेली.
शांताक्रुज पोलीस स्टेशनला हवालदार या पदावर असलेले अमळनेरचे सुपुत्र सुभाष गायकवाड ( उर्फ दादू पैलवान )हे ड्युटी संपवून घरी जात असताना यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. तात्काळ वरिष्ठ अधिकारिंना कळवले आणि लगेचच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बॉलीवूड कलाकार टायगर श्रॉफ याची सुरक्षेची जबाबदारी घेतली. त्यांनी तात्काळ टायगर श्रॉफ आणि ड्रायव्हर असलेल्या फिरदोस यांना हत्यारबंद सुरक्षेत पोलीस गाडीमध्ये नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्त लावून अतिरिक्त ड्युटी सांभाळत टायगर श्रॉफ यांना रात्रीचे दोन वाजता पोलीस गाडीमध्ये त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले.
स्वतः टायगर श्रॉफ यांची आई आणि बहीण यांनी सुभाष गायकवाड आणि इतर अधिकाऱ्यांचे आभार मानले. या अगोदरही टायगर श्रॉफ आणि परिवाराच्या संबंध वैयक्तिकरित्या सुभाष गायकवाड यांच्याशी होता.
सुभाष गायकवाड हे अमळनेर मध्ये पहिलवान आणि कराटे फायटर म्हणून ओळखले जातात
अमळनेरच्या मातीचा तालमीत आणि कराटे मध्ये तयार झालेले सुभाष गायकवाड ( उर्फ दादू पहिलवान )यांना वेळोवेळी मुंबई पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांच्या बहादूरी बद्दल सन्मान करण्यात आलेला आहे.
मुंबईसारख्या शहरात त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसवला आहे. आणि अनेक सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवली आहे.
अमळनेरच्या भूमिपुत्र असलेल्या अशा बहादूर पोलिसांच्या सर्वत्र चर्चा होत आहे.

