पवित्र दसरा विजयादशमी निमित्त प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील क्रीडा (जिमखाना)विभागात क्रीडा साहित्य पूजन करण्यात आले. ज्या खेळा मुळे आपले शरीर, मन आरोग्यदायी आणि तंदुरुस्त राहते, ज्या क्रिडांगणात आपले शारीरिक ताकत भक्कम बनते सोबत ज्या क्रीडा प्रकारात आपली समाजात चॅम्पियन म्हणून ओळख निर्माण होते. आणि जा क्रीडा साहित्यामुळे आपण आपल्या खेळात निपुण होतो. अशा खेळांचे आपण आपल्या आयुष्यात एखाद्या दैवत सारखे आराधना करतो ज्या शाळा,कॉलेज मध्ये जिमखान्यात आपण खेळानं मध्ये तयार होतो अशा क्रीडा विभागाचे आपण नेहमी ऋणी असतो.दसराचे ( अशोक विजयादशमी)औचित्य साधून अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील यांच्या माध्यमातून क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. अर्चना पाटील व विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू उपस्थित होते…
अमळनेर प्रताप महाविद्यालयात क्रीडा विभागात दसऱ्याच्या निमित्त क्रीडा साहित्य पूजन

