🔴 खान्देश 24 न्यूज | विशेष शोध वृत्तमालिका — भाग ३
निम, ता. अमळनेर | खान्देश 24 न्यूज
अमळनेर तालुक्यातील निम गावाच्या ग्रामपंचायतीच्या दप्तराबाबत सुरू असलेले प्रश्न आता केवळ ग्रामस्थांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर संबंधित शासन-प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.
सुमारे ३ हजार लोकसंख्या असलेल्या निम गावातील ग्रामपंचायतीचे दप्तर सन २०२४ ते 2026 पर्यंत उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात दोन ग्रामसेवकांच्या कार्यकाळाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे लेखी तक्रारी केल्याचे सांगितले आहे. तक्रारींच्या प्रती आणि प्राप्तीचे पुरावेही उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
कागदोपत्री तक्रारी असूनही प्रश्न अनुत्तरित?
ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही दप्तराची सद्यस्थिती काय, त्याचा शोध घेण्यासाठी कोणती कार्यवाही झाली आणि दोषी किंवा जबाबदार व्यक्ती निश्चित करण्यात आल्या का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीचे दप्तर म्हणजे गावाच्या विकासाचा आणि आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा दस्तऐवज असतो. त्यामुळे अभिलेख उपलब्ध नसल्याची तक्रार गंभीरतेने घेऊन त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे?
ग्रामस्थांना आपल्या गावाच्या कारभाराची माहिती मिळणार तरी कधी? तक्रारींची चौकशी होणार तरी कधी? आणि ग्रामपंचायतीच्या दप्तराबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर येणार तरी कधी?
हे प्रश्न आता प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
खान्देश 24 न्यूजचा सवाल!
निम गावातील ग्रामस्थांना आपल्या ग्रामपंचायतीच्या दप्तरासाठी वर्षभरापासून पाठपुरावा का करावा लागत आहे? संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात नेमकी काय कार्यवाही केली?
खान्देश 24 न्यूज या प्रकरणातील तक्रारी, उपलब्ध कागदपत्रे आणि संबंधितांची अधिकृत बाजू तपासून सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
🔎 पुढील भाग ४ मध्ये : निम ग्रामपंचायतीच्या दप्तराबाबत जबाबदारी कोणाची? दोन ग्रामसेवकांच्या कार्यकाळाबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि प्रशासनाची भूमिका!
खान्देश 24 न्यूज
सत्य | वेग | जनतेच्या हितासाठी

