धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ढेकुसिमअंबासन येथे यात्रेचा उत्साहात शुभारंभ!
पुढील वर्षी यात्रेच्या वेळी महादेवाचे नवीन मंदिर उभारण्याचा ग्रामस्थांचा संकल्प; दादासो पप्पू दादांच्या हस्ते नारळ फोडून यात्रेला सुरुवात
ढेकु सिम अंबासन अमळनेर : धनत्रयोदशीच्या पावन मुहूर्तावर आपल्या ढेकुसिमअंबासन या गावी सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक यात्रेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आला. गावातील महादेव मंदिराच्या जागेवर विधिवत नारळ फोडून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी दादासो पप्पू दादा यांच्या शुभहस्ते नारळ फोडून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी गावातील नागरिक व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर महादेवाच्या चरणी नारळ अर्पण करून यात्रेची परंपरा यंदाही जपण्यात आली.
या शुभारंभाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुढील वर्षी यात्रा भरण्याच्या वेळी याच ठिकाणी महादेवाचे नवीन मंदिर उभे राहिलेले असेल, असा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला. महादेवाचे भव्य आणि सुंदर मंदिर उभारण्याच्या या संकल्पामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावाची धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि एकजुटीचे प्रतीक असलेली ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून गावातील सामाजिक ऐक्य जपणारा महत्त्वाचा उत्सव आहे. पुढील वर्षी नवीन मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्याचे स्वप्न साकार व्हावे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
हर हर महादेव! पुढील वर्षी नवीन मंदिरात भेटूया, या संकल्पासह यात्रेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.
खान्देश 24 न्यूज

