खान्देश 24
अमळनेर, प्रतिनिधी
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना अखिल स्तरीय महा-ई-सेवा संघटनेचे निवेदन; नवीन आपले सरकार केंद्राची जाहिरात रद्द करण्याची मागणी
*जळगाव, दि. ५ -* जळगाव जिल्ह्यातील नवीन आपले सरकार सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्रांची प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात तात्काळ रद्द करावी आणि दि. ०४/११/२०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी अखिल स्तरीय महा-ई-सेवा व आधार केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी मा. रोहनजी घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. अमोल पढार आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री. जगदीश युवराज तापडे यांनी हे निवेदन दिले.
*निवेदनात काय म्हटले आहे?*
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. जळगाव जिल्ह्यात नवीन केंद्र वाटपाबाबत संघटनेने शासन स्तरावर वारंवार मागण्या करूनही दखल घेतली गेली नाही.
२. याबाबत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल याचिका क्र. WP/51391/2025 (CNR No. HCBM040273582025) आणि मा. लोकआयुक्त व मा. उपलोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने पत्र क्र. उलोआ/कॉम/३०७/२०२६ दि. १६/०८/२०२६ अन्वये आदेश दिला आहे की, जिल्हा स्तरावरून नव्याने सेतू / महा-ई-सेवा केंद्राची जाहिरात प्रसिद्ध करू नये.
३. या आदेशाच्या अनुषंगाने दि. १३/०८/२०२५ रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन मा. विभागीय आयुक्तांनी दि. २०/०८/२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांना पत्र देऊन जाहिरात रद्द करण्याबाबत कळविले होते.
४. असे असतानाही जळगाव जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात प्रसिद्ध करून दि. ०४/११/२०२६ रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला.
त्यामुळे मा. उच्च न्यायालयाच्या याचिकेचा आणि मा. लोकआयुक्तांच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
*मागण्या:*
– जळगाव जिल्ह्यात काढलेली नवीन आपले सरकार व महा-ई-सेवा केंद्राची जाहिरात तात्काळ रद्द करावी.
– या बाबत जिल्ह्यातील संपूर्ण १५ तालुक्यातील तहसीलदारांना तात्काळ आदेश द्यावेत.
– दि. ०४/११/२०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालाला तात्काळ स्थगिती द्यावी.
या निवेदनाच्या प्रती मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांनाही देण्यात आल्या आहेत.
यावेळी, जिल्हा कार्याध्यक्ष नकुल बारी, जिल्हा खजिनदार राजू सोनवणे, जळगाव शहर अध्यक्ष मनोज निबाळकर , सिद्धार्थ पवार, राजा सय्यद, गुणवंत देशमुख, संजय खैरनार, सागर चौधरी, तन्मय तायडे, प्रशांत वाणी, हरीश बोरसे, ललित सोनार, किरण सावळे, स्वप्निल पवार, सूर्यकांत पाटील, इमरान शेख, महेंद्र कोळी, उमेश कोल्हे, संगीता महाजन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

