- खान्देश 24 न्यूज
😱नाव मोठे लक्षण खोट😱
अमळनेरच्या प्रसिद्ध शुगरण स्पाईज ‘रोटी आणि रसोई’ हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्यात झुरळ आढळल्याचा ग्राहकाचा दावा!
ग्राहकाने व्हिडिओद्वारे मांडली कैफियत; हॉटेल व्यवस्थापनाच्या कथित उत्तरामुळे संतापाचे वातावरण!
अमळनेर शहरातील प्रसिद्ध शुगरण स्पाइज ‘रोटी N रसोई’ हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या अजिंक्य चिखलोदकर नामक नियमित ग्राहकाला पिण्याच्या पाण्यात झुरळ आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे
या घटनेचा व्हिडिओ संबंधित ग्राहकाने तयार केला असून, त्यामुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने हा प्रकार लक्षात येताच हॉटेलचे मालक सरजू शेठ गोकलानी यांच्याशी फोनवर संपर्क साधल्याचे सांगितले जाते. मात्र, ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, त्यांना समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी ‘तुम्ही व्हिडिओ करा किंवा काहीही करा, आमचे कोणी काही करू शकत नाही,’ अशा आशयाचे उत्तर मिळाल्याचा आरोप आहे.

जर ग्राहकाचा हा आरोप खरा असेल, तर हा केवळ एका ग्राहकाचा अपमान नसून ग्राहकांच्या तक्रारींकडे पाहण्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनावरही गंभीर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार आहे.
प्रश्न एवढाच आहे की, ग्राहक पैसे देऊन जेवण करतो, तेव्हा त्याच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची?
खान्देश 24 न्यूज या प्रकरणाची पुढील माहिती घेणार असून, हॉटेल व्यवस्थापनाची बाजूही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
खान्देश 24 न्यूज | अमळनेर

