अमळनेर |खान्देश 24 न्यूज
निम ग्रामपंचायत भाग 4
अमळनेर तालुक्यातील निम ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आता एकामागून एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.2024,25,26 पासूनन चे ग्रामपंचायतीचे दप्तर नेमके कुठे आहे?
अधिकृत अभिलेख कोणाच्या ताब्यात आहेत? आणि गावातील नागरिकांकडून करण्यात आलेल्या घरपट्टी वसुलीचा हिशेब नेमका कुठे नोंदवला गेला आहे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीतील एका ग्रामसेवकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायतीचे दप्तर घरी नेल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी व्हिडिओ चित्रित केल्याचेही समजते. जर अधिकृत दप्तर कार्यालयाबाहेर नेले असेल, तर ते कोणत्या अधिकाऱ्याच्या परवानगीने, कोणत्या कामासाठी आणि कोणत्या नोंदीसह नेण्यात आले, याचा खुलासा होणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, दुसऱ्या ग्रामसेवकाच्या कार्यकाळात दप्तर उपलब्ध नसतानाही गावातून लाखो रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मग या वसुलीचा हिशेब नेमका कुठे आहे?
– घरपट्टी वसुलीच्या अधिकृत पावत्या कोणत्या नोंदवहीत नोंदवल्या आहेत?
– वसूल झालेली रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा झाली आहे का?
– रोख रकमेचा हिशेब आणि रोकडवही उपलब्ध आहे का?
– मागील दोन वर्षांचे घरपट्टी वसुली रजिस्टर आणि जमा-खर्चाचे अभिलेख कुठे आहेत?
– दप्तर कार्यालयाबाहेर नेण्याबाबत वरिष्ठांची परवानगी होती का?
हे प्रश्न केवळ ग्रामस्थांचे नसून ग्रामपंचायतीच्या आर्थिक पारदर्शकतेशी संबंधित आहेत.
प्रशासनाने खुलासा करावा!
गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांनी निम ग्रामपंचायतीच्या मागील दोन वर्षांच्या घरपट्टी वसुलीची, पावत्यांची, बँक जमा नोंदींची आणि दप्तराच्या ताब्याची सखोल चौकशी करावी. तसेच संबंधित ग्रामसेवकांची बाजूही अधिकृतपणे समोर आणावी.
दप्तर कार्यालयात नाही, वसुलीचा हिशेब स्पष्ट नाही, तर गावाचा कारभार पारदर्शक कसा राहणार?
निम ग्रामपंचायतीच्या कारभाराचे सत्य बाहेर येणार का? पुढील भागात दोन्ही ग्रामसेवक,सरपंच, आणि ग्रामसभा सदस्यांची कथा!
खान्देश 24 न्यूज – सत्य | वेग | जनतेच्या हितासाठी

