शासन-प्रशासनाच्या फाईलमधून गायब झालेले गाव निम 

🔴 खान्देश 24 न्यूज | विशेष शोध वृत्तमालिका — भाग 1

अमळनेर तालुक्यातील सुमारे ३ हजार लोकसंख्या असलेल्या निम गावाचा ग्रामपंचायत दप्तराबाबत गंभीर प्रश्न!

एक वर्षापासून तक्रारी केल्याचा ग्रामस्थांचा दावा; तरीही प्रश्न अनुत्तरित?

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम गावाच्या ग्रामपंचायतीच्या दप्तराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सन २०२४-२५ पासून ग्रामपंचायतीचे दप्तर उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाबाबत मागील सुमारे वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, या तक्रारींवर नेमकी कोणती कार्यवाही झाली, दप्तराची सद्यस्थिती काय आहे आणि जबाबदारी कोणाची, याबाबत स्पष्ट माहिती समोर येणे आवश्यक आहे.

पाडळसे धरण परिसरातील या गावाच्या ग्रामपंचायतीच्या दप्तराबाबतच प्रश्न निर्माण होत असतील, तर गावाच्या प्रशासकीय कामकाजाची पारदर्शकता आणि अभिलेखांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

मग प्रश्न असा उपस्थित होतो — निम गावाच्या ग्रामपंचायतीच्या दप्तराचे नेमके झाले तरी काय? ग्रामस्थांच्या तक्रारींवर प्रशासनाने काय केले?

खान्देश 24 न्यूज या प्रकरणाचा कागदपत्रांच्या आधारे पाठपुरावा करणार आहे.

🔎 पुढील भागात : तक्रारींचे पुरावे आणि प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत महत्त्वाचे प्रश्न!

खान्देश 24 न्यूज,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?