तथाकथित मातंग पुढ्याऱ्यांनी महापुरुषांच्या बरोबरीचा लाईनीत शुल्लक अशा अती सामान्य दर्जाचा व्यक्तींना बसवू नये

सविस्तर वृत्त असे की येत्या 26 तारखेला मातंग समाजाचा त्यांच्या काही मांगन्यान साठी अमळनेर शहरात मोर्चा आयोजित केला आहे. त्या मोर्चा चा निमित्ताने मातंग समाजाचा तथाकथित पुढाऱ्यांनी जे पोस्टर बनवले आहे त्या पोस्टर मध्ये

राष्ट्र निर्माते,भारतीय समाजाचा उद्धार करणारे,जागतिक बुद्धिवंत, ऐतिहासिक अश्या महापुरुषांच्या फोटो लावण्यात आलेला आहे

आणि त्यांच्या बरोबरीच्या लाईनीत अती सामान्य दर्जा चा आणि इतर सामाजासाठी पूर्ण अनोळखी असलेल्या व्यक्तींना पोस्टर मध्ये महापुरुषांच्या एका लाईनीत बसवले आहे.

हा एका प्रकाराणे त्या राष्ट्र निर्माते महापुरुषांच्या अपमान आहे. किंवा विटंबना सारखे आहे.

जातीचा मागण्यांसाठी
मोर्चा आयोजित करणाऱ्या तथाकथित मातंग पुढार्‍यांना एवढी ही समज नसेल का? की ज्या

महापुरुषांच्या अथांग अशा कार्यामुळे भारतीय समाज जीवन सामाजिक आणि बौद्धिक रित्या प्रभावित आहेत.

अशा महापुरुषांच्या सोबत शुल्लक अशा गल्लीबोळातील किंवा एखाद्या शहरात तालुक्यात जिल्ह्यात फक्त जातीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पोस्टरा मध्ये एका लाईनीत बसवून त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे किंवा मागासलेपणाचे प्रदर्शन तर करत नाही ना (खरे तर हे समजण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज असते)? किंवा अशा पोस्टरातून  त्यांना सिद्ध काय करायचे आहे?.

उद्या उठून जर कोणी अशा पोस्टवर महापुरुषांच्या विटंबना केली म्हणून तीव्र आक्षेप घेतला तर.??? त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची कल्पना तथाकथित मातंग पुढऱ्यांना नसेल का?

मागण्यांचे पोस्टर बनवताना आणि महापुरुषांचे फोटो लावताना अशा पुढाऱ्यांनी बुद्धीच्या कस लावून विचार करावा (जर असेल तर)की महापुरुषाच्या दर्जा कोणाला द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?