अमळनेर प्रताप महाविद्यालयातील पुरुष गटाची विजय सलामी तर महिला गट उपविजयी 

 

अमळनेर, प्रतिनिधी,

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समितीतर्फे धनदाई माता महाविद्यालय, अमळनेर येथे सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन कबड्डी पुरुष व महिला स्पर्धांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये पुरुष गटातील १० संघांनी, तर महिला गटातील संघांनी सहभाग नोंदविला. सर्व सामने अत्यंत चुरशीचे आणि उत्कंठावर्धक झाले.
पुरुष गटातील अंतिम सामना प्रताप महाविद्यालय, अमळनेर आणि राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा यांच्यात झाला. सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नाणेफेक करून अंतिम सामन्याला सुरुवात करण्यात आली.

दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सामना अत्यंत अटीतटीचा केला. निर्धारित वेळ संपल्यानंतर दोन्ही संघांचे गुण समान असल्याने सामन्याचा निकाल लावण्यासाठी प्रत्येक संघाला पाच चढायांची संधी देण्यात आली. या निर्णायक चढायांमध्ये सरस कामगिरी करत प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांनी पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले, तर राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा यांनी उपविजेतेपद मिळविले.

महिला गटातील स्पर्धेत प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांनी उपविजेतेपद पटकावले. महिला खेळाडूंनीही उत्कृष्ट कौशल्य, सांघिक भावना आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.

अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही संघांमधील अटीतटीची लढत प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
या यशाबद्दल
खा. शि मंडळ मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मा. विश्वस्थ, मा. कार्याध्यक्ष सी ए निरज अग्रवाल , कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन ,मा.सर्व संचालक मंडळ,मा. सचिव प्रा. पराग पाटील ,सहसचिव डॉ.व्ही बी मांटे,मा. प्र.प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, मा. सर्व उप प्राचार्य, मा. IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे,मा. जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य डॉ.एस बी नेरकर,अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव,एरंडोल विभाग सचिव डॉ.देवदत्त पाटील,कुलसचिव राकेश निळे, सर्व जिमखाना समिती सदस्य, संघ व्यवस्थापक डॉ. सचिन पाटील,संघ प्रशिक्षक प्रा. अर्चना सचिन पाटील, अनिरुद्ध शिसोदे,निखिल पाटील,प्रशांत देवकते आणि सर्व प्रताप महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू यांनी कबड्डी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?