पातोंडा, ता. अमळनेर, जि. जळगाव :
श्री दत्त विद्या मंदिर, पातोंडा येथील सन २०००-२००१ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा ३ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आल्याने शाळेचा परिसर जुन्या आठवणींनी भारावून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. सी. पाटील सर होते. यावेळी माजी मुख्याध्यापक जगताप सर, तसेच भावसार सर, प्रदीप लोहारे सर, वालजी सर, झंझणे सर आणि विखे पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंचवीस वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. जुन्या शाळेतील आठवणी, वर्गातील गंमती-जमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि बालपणीचे किस्से यांना उजाळा देत विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या मित्र-मैत्रिणींचे स्नेहबंध पुन्हा घट्ट झाले. अनेक वर्षांनंतर आपल्या गुरुजनांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षकांनीही माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्रित छायाचित्र काढून हा अविस्मरणीय क्षण आठवणीत जतन केला.
पंचवीस वर्षे उलटली, काळ बदलला; मात्र शाळेतील मैत्री आणि आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत, याचा सुंदर प्रत्यय या स्नेहमेळाव्यातून आला.


Very nice news