नगाव खुर्द येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नैसर्गिक शेती अभियान ,नव चेतना शिबिर व खेत बचाओ अभियान उत्साहात संपन्न तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२६-२७ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

खान्देश 24 न्यूज

नगाव खुर्द (ता. अमळनेर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२६-२७, क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रसायनमुक्त शेती अभियान खेत बचाओ अभियानांतर्गत नैसर्गिक शेती प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले.

या अभियानाचे आयोजन इंदासी माता मंदिर परिसरात करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच नैसर्गिक शेतीचे फायदे, रासायनिक शेतीला पर्याय, नैसर्गिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांची निर्मिती व उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे नैसर्गिक शेती प्रशिक्षक श्री. पोपटराव भराटे, श्री. बी. एन. पाटील, डॉ. आदित्य माहेश्वरी व श्री. पवनकुमार वाघ यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी नगाव खुर्दच्या सरपंच सौ. सरला चंद्रकांत जगदाळे तसेच नगाव खुर्द व नगाव बु येथील कृषी सहाय्यक अधिकारी श्री. नवल वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक श्री. पवनकुमार वाघ यांनी नैसर्गिक शेती, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व व सुदर्शन क्रिया व ध्यानाचे महत्त्व गावागावांत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे प्रत्येक गावात आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैसर्गिक शेतीविषयी जनजागृती होण्यास मदत झाली.
तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पंचायत समिती अंमळनेर येथील गटविकास अधिकारी एन आर पाटील व सुरेश कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतारा खड्डे व्हीबी रामची योजनेअंतर्गत होणारी विविध विकास कामे, छोट्या छोट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याची कामे करण्याचा मानस नगाव खुर्द येथील शेतकरी बंधू भगिनींनी व्यक्त केला नगाव खुर्द येथील गावकऱ्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे आभार मानून पुढील शिबिर लवकरात लवकर घेण्याबाबत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?