एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई; दिलीप बंजारा यांच्या पुढाकाराने अनधिकृत बस वाहतुकीवर कारवाईचा बडगा

धुळे बसस्थानक परिसरात विनापरवाना मध्यप्रदेश परिवहन बसवर कारवाई; तब्बल १२०००हजार ५०० रुपयांचा दंड!

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई; दिलीप बंजारा यांच्या पुढाकाराने अनधिकृत बस वाहतुकीवर कारवाईचा बडगा

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील बसस्थानक परिसरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसवर कारवाई करण्यात आली आहे. धुळे एसटी महामंडळाचे अधिकारी मा. दिलीप बंजारा साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित बसवर तब्बल १२००० हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे बसस्थानक परिसरात मध्यप्रदेश परिवहनची बस विनापरवाना वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत कारवाई केली. यावेळी संबंधित बसची तपासणी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात विनापरवाना किंवा नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील नियमांचे पालन होणे आवश्यक असून, परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केल्यास संबंधित वाहनांवर कारवाई होऊ शकते, असा संदेश या कारवाईतून मिळत आहे.

अनधिकृत प्रवासी वाहतुकीला आळा बसणार?

एसटी महामंडळाच्या बसस्थानक परिसरात खासगी तसेच इतर राज्यांच्या बसकडून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या नियमांबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असतात. अशा परिस्थितीत धुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

मा. दिलीप बंजारा साहेब आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे विनापरवाना प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईची अपेक्षा!

प्रवाशांची सुरक्षितता, वाहतुकीचे नियम आणि एसटी महामंडळाच्या अधिकृत व्यवस्थेचे नियमन या बाबी लक्षात घेता बसस्थानक परिसरात नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. यापुढेही विनापरवाना किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अशाच प्रकारे कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

धुळे बसस्थानकातील या कारवाईची सध्या परिसरात चर्चा असून, १२००० हजार ५०० रुपयांच्या दंडामुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

खान्देश 24 News.Com | धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?