अमळनेर, प्रतिनिधी
खान्देशांतील नामवंत खा शि मं संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेने नुकत्याच संपन्न झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत 14 व 17 वयोगटात मुलिंनी अंतिम सामन्यात 14 मध्ये ललिता पाटील स्कुल व 17 मध्ये आश्रम शाळा रणाईचे यांना पराभुत करून घवघवीत यश संपादन करून दुहेरी विजेतेपद मिळविले.
पुढिल जिल्हास्तर स्पर्धा छ शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणार आहे.
14 वर्षाआतील संघ ..कर्णधार .जिंकरा शेख शाकिर , भैरवी पाटील , कृतीका वाडेकर , आराध्या पाटील,श्रावणी साळुंखे , लावण्या पाटील ,दिव्या पाटील ,कावेरी अहिरे ,हिमानी पाटील ,रीदा फातेमा सादीक , हिमानी पाटील
17 वर्षे… कर्णधार अश्मिरा शाकिर शेख ,कावेरी पाटील,पुनवी निकम , कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार , लिना गुरव , कामिनी सोनवणे , वैष्णवी पाटील, समिक्षा जाधव ,रिशिका गोयल ,स्नैहल पाटील , मोनिका भोई
वरील खेळाडूनी दोन्ही गटात घवघवीत यश संपादन करून दुहेरी मुकुट सह विजेतेपद मिळविले असुन जिल्हास्तरावर पात्र झाला.
या संघास विजयी चषक व बुके देऊन अमळनेर तहसिलदार डॉ.उमा ढेकळे मॅडम यांनी सन्मान करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी , उपमुख्याध्यापक श्री एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी , कार्यालय प्रमुख श्री शाम पवार , श्री एस एस माळी , श्रीमती आर एस सोनवणे ,श्री किरण सनेर , यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
वरील यश संपादन केलेल्या संघास क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती आर एस सोनवणे यांनी परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले.

