विद्यापीठ विभागीय महिला क्रिकेट स्पर्धा अमळनेर प्रताप महाविद्यालयात उत्साहात संपन्न

अमळनेर, प्रतिनिधी 

विद्यापीठ विभागीय महिला क्रिकेट स्पर्धा अमळनेर प्रताप महाविद्यालयात उत्साहात संपन्न

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समिती द्वारा प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर आयोजित आंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आज प्रताप महाविद्यालय करण्यात आले होते.

जळगाव,धुळे, एरंडोल, नंदुरबार असे चार विभागीय संघ या स्पर्धेत सहभागी होते
यात धुळे विभागाने प्रथम क्रमांक तर एरंडोल विभागाने द्वितीय क्रमांक मिळवला..

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खा.शी मंडळाचे माननीय सचिव प्रा.पराग पाटील सहसचिव डॉ.विजय मांटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य हर्षवर्धन जाधव, स्पर्धेचे उद्घाटक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, एरंडोल विभाग क्रीडा समिती सचिव डॉ.देवदत्त पाटील, निवड समिती सदस्य डॉ.आनंद उपाध्याय,डॉ. हसीन तडवी,धुळे विभाग सचिव डॉ. हर्षदा पाटील,विद्यापीठ अधीसभा सदस्य व जिमखाना समन्वयक डॉ.संदीप नेरकर, संघ व्यवस्थापक डॉ. नीलिमा पाटील,डॉ. विनय पवार, डॉ. नरेश बागल,डॉ.योगेश ठाकूर, डॉ. अमोल अहिरे,उप प्राचार्य डॉ. ए जे पाटील, उप प्राचार्य डॉ.कल्पना पाटील, उप प्राचार्य डॉ.धनंजय चौधरी, उप प्राचार्य डॉ. योगेश तोरवणे,उप प्राचार्य व क्रीडा संचालक प्रा. अमृत अग्रवाल,डॉ. सुनील राजपूत, डॉ. अमोल मानके, डॉ.संतोष दीपके, डॉ. किरण सूर्यवंशी,प्रशांत देवकते, पंच अजय पाटील, सुरज मोरे,कार्तिकी काळे व सर्व खेळाडू प्रेक्षक उपस्थित होते…

सर्व स्पर्धा आयोजन नियोजन डॉ. सचिन पाटील, प्रा. अर्चना सचिन पाटील आणि जिमखाना समिती यांनी सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?