अमळनेर,प्रतिनिधी
अमळनेर शहरातील आणि खान्देशांतील प्रसिद्ध कलाकार आणि रिल स्टार असलेले तसेच रवी बॉडीगार्ड म्हणून ओळख असलेले हरहुन्नरी कलाकार रवींद्र भोई यांनी खानदेशवाशींची श्रद्धा असलेली सती माय वरील प्रथम गाणे काढून नवरात्रीची खानदेश वाशियांसाठी भक्तिमय भेट दिली आहे….
ज्या देवीला संपूर्ण खानदेशातील लोक सती माय म्हणून मोठया श्रद्धेने उल्लेख करतात त्या देवीचा मंदिराची अख्खायिका आहे अमळनेर पासून 4,5 किलोमीटर असलेले चांदनी कुऱ्हे गावाजवळ सुरत भुसावळ जाणारी रेल्वे चा दोन पटरीचा मधोमध हे मंदिर आहे या मंदिराला खान्देशांतील बहुतेक श्रद्धाळु भेट देत असतात
ही अख्खायिका सर्वदूर पोहचावी म्हणून रवींद्र भोई (रवी बॉडीगार्ड) यांनी ऐकायला सुंदर असे सती माय मंदिरा बद्दल अख्ख्यायिका सांगणारे आणि पहिल्यांदा लिहिले गेलेले अहिराणी भाषेतील विडिओ गाणे बनवले आहे
एकेकाळी बॉलीवूड कलाकार अमीर खान यांचे बॉडीगार्ड असलेले रवींद्र भोई हे आपल्या रील्स चा माध्यमातून समाज प्रबोधन करणारे रील्स बनवून नेहमी समाज माध्यमातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करतात…..सती माय वरील त्यांच्या या गाण्यात कलाकार म्हणून स्वतः रविंद्र भोई (रवि बॉडीगार्ड ), वैष्णवी भोई, ओम भोई (pk), जिगर शिंदे, जयेश पाटील, पवन भोई, राहुल परदेशी, आदेश भोई, जयेश परदेशी, सुदाम जी महाराज इत्यादी कलाकार आहेत.
त्यांच्या या गाण्याला खानदेशी लोकांकडून भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

