३ ऑक्टोंबर ला आपल्या आपल्या शाळेत श्री दत्तविद्या मंदिर, पातोंडा येथे गेट-टुगेदरच्या निमित्ताने आपण सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आलो. तब्बल पंचवीस वर्षांनंतर भेटताना मन आनंदाने भरून आले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या, शाळेचे दिवस डोळ्यांसमोर उभे राहिले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या बालपणीच्या आठवणींचे हास्य दिसत होते.
पण या आनंदाच्या क्षणी मनाच्या एका कोपऱ्यात एक मोठी खंत होती… एक पोकळी होती…
ती म्हणजे आपल्या काही लाडक्या गुरुजनांची अनुपस्थिती.
३ ऑक्टोबरचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा होता; पण त्या आनंदात आपल्या स्वर्गवासी गुरुजनांची आठवण वारंवार मनाला चटका लावत होती.
आपले लाडके लोअर सरजी, आर. व्ही. पवार सर, अभय सर, दीपक सर, सी. एम. पाटील सर, अरुण सर, ए. के. अत्तदे सर आणि गरीब सर…
आज ते आपल्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित नाहीत.
पण खरं सांगायचं तर…
ते आपल्यापासून दूर गेलेले नाहीत.
ते आपल्या आठवणींमध्ये आहेत, आपल्या संस्कारांमध्ये आहेत आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक यशामध्ये आहेत.
आपण आज जे काही आहोत, त्यामागे आपल्या आई-वडिलांसोबतच या गुरुजनांचा मोठा वाटा आहे.
त्यांनी केवळ आम्हाला पुस्तकी शिक्षण दिले नाही, तर माणूस म्हणून जगायला शिकवले.
चांगले संस्कार दिले.
शिस्त शिकवली.
चुकलो तर ओरडले, पण त्यामागेही आपल्याबद्दलचे प्रेम होते.
आज आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात आहोत. कोण कुठे पोहोचले, कोणाचे काय झाले—हे पाहताना मनात एक विचार येतो…
“आज हे सगळं पाहायला आपले ते गुरुजी असते तर किती आनंदी झाले असते!”
कदाचित आज आपण गेट-टुगेदरमध्ये एकत्र बसलो असताना, एखाद्या कोपऱ्यात त्यांचा आवाज ऐकू यावा असे वाटत होते…
“काय रे मुलांनो, एवढ्या वर्षांनी आठवण झाली का शाळेची?”
पण तो आवाज आज ऐकू आला
असो पुन्हा गुरुवार यांना भाव श्रद्धांजली 💐🙏
अविनाश वानखेडे

