अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अमळनेर तालुका नवीन कार्यकारिणीची घोषणा!

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अमळनेर तालुका नवीन कार्यकारिणीची घोषणा!

सुर्यकांत साहेबराव पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड; महिला कार्यकारिणीचीही नियुक्ती

अमळनेर, दि. १७ नोव्हेंबर २०२६ : अखिल भारतीय मराठा महासंघ अमळनेर तालुका संघटनेची वार्षिक सभा आज मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी साने गुरुजी वाचनालय, अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. श्री. उमेश पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तालुक्याची नवीन वार्षिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संस्थापक अध्यक्षांचे स्मरण करून संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर

सभेत खालील पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.

1. सुर्यकांत साहेबराव पाटील – तालुकाध्यक्ष
2. ईश्वर देविदास पाटील – उपाध्यक्ष
3. वासुदेव भालेराव पाटील – उपाध्यक्ष
4. खंडेराव निंबा पाटील – सरचिटणीस
5. बाळू शांताराम पाटील – कोषाध्यक्ष
6. सुभाष शिवाजी देसले – सचिव
7. कपिल बन्सीलाल पाटील – तालुका संघटक
8. भैय्या पाटील (सरपंच) – सहसचिव

महिला कार्यकारिणीचीही निवड

संघटनेच्या कामकाजात महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि महिलांचे संघटन अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने महिला कार्यकारिणीचीदेखील निवड करण्यात आली.

1. श्रीमती सुनंदा संभाजी पाटील – महिला तालुकाध्यक्ष
2. मीना दिनेश पाटील – महिला उपाध्यक्ष
3. वैशाली यशवंत पाटील – महिला सचिव

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत व नियुक्तीपत्र प्रदान

यावेळी उपस्थित सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. श्री. उमेश पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शरद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे, समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडावी आणि सामाजिक एकोपा व संघटनात्मक बळकटीसाठी प्रयत्न करावेत, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

संघटनात्मक कार्याला मिळणार नवी दिशा!

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अमळनेर तालुका नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे तालुक्यात संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम, सामाजिक प्रश्नांवर पाठपुरावा आणि संघटनेची बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

खान्देश 24 न्यूज, अमळनेर
बातमी आपल्या परिसराची… आवाज जनतेचा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?