खान्देश 24 न्यूज
अमळनेर : स्वप्न मोठी असतील आणि ती पूर्ण करण्याची जिद्द मनात असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाचा मार्ग नक्की सापडतो, याचे उदाहरण म्हणजे अमळनेरचे सुपुत्र राहुल रमेश सपकाळे!
अमळनेरच्या मातीत घडलेले राहुल सपकाळे यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कल्याण, उल्हासनगर ते भिवंडीकडे वाटचाल केली. आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी भिवंडीत स्वतःची उद्योजकीय ओळख निर्माण केली. अमळनेरसारख्या शहरातून बाहेर पडून दुसऱ्या शहरात स्वतःचे स्थान निर्माण करणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
मात्र राहुल सपकाळे यांचे व्यक्तिमत्त्व केवळ उद्योग आणि व्यवसायापुरते मर्यादित नाही. समाजातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांविषयी त्यांना विशेष जाणीव आहे. स्वतःच्या प्रगतीसोबत समाजातील गरजू माणसांचाही विचार करणे, सामाजिक कार्यात योगदान देणे आणि माणुसकीची नाळ जपणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख आहे.
आजच्या धावपळीच्या जगात अनेक जण स्वतःच्या यशामागे धावत असताना आपल्या माणसांना आणि समाजाला विसरतात; मात्र राहुल सपकाळे यांनी उद्योजकतेसोबत सामाजिक बांधिलकीही जपली आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरकरांच्या वतीने त्यांना निरोगी, दीर्घायुष्य आणि उद्योजकीय क्षेत्रात उत्तरोत्तर यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!
अमळनेरचा सुपुत्र, भिवंडीतील युवा उद्योजक आणि सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व राहुल रमेश सपकाळे यांना खान्देश 24 न्यूज परिवारा कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
— खान्देश 24 न्यूज, अमळनेर

