B. BOYS बॉक्सिंग अकॅडमी अमळनेर च्या खेळाडूंना युवा उद्योजक राहुल भाऊ सपकाळे यांची अनमोल भेट!

खान्देश 24 न्यूज, अमळनेर 

अमळनेर : B. BOYS बॉक्सिंग अकॅडमीतील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने युवा उद्योजक मा. राहुल भाऊ सपकाळे (भिवंडी) यांनी B. BOYS बॉक्सिंग अकॅडमीला चार दर्जेदार बॉक्सिंग ग्लोव्हज भेट दिले.आपल्या शहरातील आपल्या मातीतील मुलं,युवा, तरुणांनी कोणत्याही क्षेत्रात आपल्या गावाचे आपल्या मातीचे नाव उजवलं करावे या उदात्त हेतूने बॉक्सिंग अकॅडमिला पुढेही सहकार्य असेल अभि वचन त्यांनी संचालक कोच भूपेंद्र शिरसाठ यांना दिले 
या भेटीमुळे अकॅडमीतील खेळाडूंना सरावासाठी प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या क्रीडा प्रवासाला नवी ऊर्जा मिळणार आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या सहकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी B. BOYS बॉक्सिंग अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक भूपेंद्र शिरसाठ यांनी राहुल भाऊ सपकाळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

खेळाडूंना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्राला बळ आणि नव्या पिढीला संधी, हाच या उपक्रमाचा संदेश!
B. BOYS बॉक्सिंग अकॅडमी, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?