मुडी/ दरेगाव ग्रामपंचायत येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

खान्देश 24 न्यूज, अमळनेर

अमळनेर, दि. १५ नोव्हेंबर :-* आज भगवान बिरसा मुंडा धरती आबा यांची जयंती मुडी/दरेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धरती आबांनी जल, जंगल, जमिनीसाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुडी / दरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच रमेश सोनवणे, दशरत पवार राज निकम हंसराज निकम योगिराज मालचे राज मालचे व आदिवासी बांधव उपस्थित होते.

जय आदिवासी ! जय जोहार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?