खानदेश 24 न्यूज अमळनेर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न!

जळगाव | दिनांक २४ ऑक्टोबर २०२६

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आंतरविभागीय बास्केटबॉल पुरुष व महिला स्पर्धा दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेत पुरुष व महिला खेळाडूंनी क्रीडानैपुण्य, संघभावना आणि उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले.

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील सर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. नरेश बागल, डॉ. किशोर वाघ आणि प्रा. अमर हटकर यांचा समावेश होता. स्पर्धेचे कामकाज पार पाडण्यासाठी राष्ट्रीय पंच वाल्मिक हटकर आणि आंतरराष्ट्रीय पंच सोनल हटकर यांनी पंच म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

या स्पर्धेसाठी विविध विभागांतील संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, माजी खेळाडू, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळाडूंना प्रोत्साहन देत क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरले.

विद्यापीठ स्तरावर आयोजित अशा आंतरविभागीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव मिळतो. तसेच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्ती विकसित होण्यास मदत होते. पुरुष व महिला खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात.

उपस्थित मान्यवर, पंच, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

खानदेश 24 न्यूज अमळनेर
स्थानिक बातम्या, क्रीडा घडामोडी आणि जनतेचा आवाज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?