क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा माध्यमातून जिल्हाधिकारी ला निवेदन दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा! आणि ग्रामपंचायतीवरील प्रशासकांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करण्याची मागणी

खान्देश 24 न्यूज, अमळनेर

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीमधून उत्पन्न मिळत नसल्याने तसेच रोजगाराच्या संधी कमी झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतींकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांना तगादा लावला जात असून, सक्तीच्या वसुलीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 

या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी तसेच सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या कामकाजाची तपासणी करून त्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

1. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींवरील प्रशासकांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करण्यात यावी.
2. घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीची वसुली तात्काळ थांबविण्यात यावी.
3. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात यावेत.
4. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावी.
5. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना यासंदर्भात लेखी आदेश काढण्यात यावेत.
6. संबंधित गटविकास अधिकदुष्काळी परिस्थिती लक्षात घेता घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा!

ग्रामपंचायतीवरील प्रशासकांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीमधून उत्पन्न मिळत नसल्याने तसेच रोजगाराच्या संधी कमी झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतींकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांना तगादा लावला जात असून, सक्तीच्या वसुलीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी तसेच सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या कामकाजाची तपासणी करून त्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

1. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींवरील प्रशासकांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करण्यात यावी.
2. घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीची वसुली तात्काळ थांबविण्यात यावी.
3. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात यावेत.
4. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावी.
5. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना यासंदर्भात लेखी आदेश काढण्यात यावेत.
6. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा व वसुलीबाबतचा अहवाल मागविण्यात यावा.

दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्याऐवजी शासनाने तातडीने घरपट्टी व पाणीपट्टी माफीचा निर्णय घ्यावा. अन्यथा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी निवेदन देतेवेळी ईश्वर उखा पाटील, शरद विनायक पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश बोरसे, ॲड. योगराज कोळी, दिलीप चौधरी, भूषण कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?